राष्ट्रीय छात्र सेनेचे अंबाजोगाईत स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST2021-08-13T04:37:57+5:302021-08-13T04:37:57+5:30
अंबाजोगाई : महाराष्ट्र बटालियन ५१अंतर्गत अंबाजोगाई विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्रता महोत्सव १ ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. भारतीय ...

राष्ट्रीय छात्र सेनेचे अंबाजोगाईत स्वच्छता अभियान
अंबाजोगाई : महाराष्ट्र बटालियन ५१अंतर्गत अंबाजोगाई विभागाच्या वतीने भारतीय स्वतंत्रता महोत्सव १ ते १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्वातंत्र्यसैनिकांचे सत्कार, ध्वजारोहण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करताना छात्र सैनिकांनी स्वतंत्रता आंदोलनातील स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंदतीर्थ व बाबासाहेब परांजपे यांच्या परिसरातील पुतळ्याची स्वच्छता केली. हे अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. ‘श्रममेव जयते’ या अभियानाचे नाव घेऊन स्वच्छतेचे महत्व तरुणांना पटवून देत स्वच्छता अभियान लोकचळवळ करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्त अभियान तसेच श्रमदानात प्रामुख्याने ‘ओला कचरा, सुका कचरा’, कचऱ्याचे व्यवस्थापन व श्रम करताना नि:स्वार्थ सेवाभाव निर्माण व्हावा, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात क्रांतिदिनी करून स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याचा संकल्प करण्यात आला. एनसीसीच्या मुलांनी हातात झाडू, खराटे, टोपले घेऊन कॉलेज परिसराची स्वच्छता केली. यावेळी सर्व एनसीसी अधिकारी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
110821\3022img-20210811-wa0007.jpg
राष्ट्रीय छात्र सेनेचे विध्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ केला