घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 19:39 IST2020-07-22T19:37:48+5:302020-07-22T19:39:47+5:30
मंगळवारी दुपारी १३ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसल्याने ती एकटी होती.

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
गेवराई : शहरातील सावतानगर येथील १३ वर्षीय मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका २९ वर्षीय युवकाने मंगळवारी ( दि. २१ ) दुपारी ३.३० च्या सुमारास अंत्याचार केला. या प्रकरणी बाललैंगिक अंत्याचार ( पोस्को ) अंतर्गत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी विशाल जवंजाळ ( २९ ) यास अटक करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी १३ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसल्याने ती एकटी होती. याच भागात राहणाऱ्या विशाल जवंजाळ याने याचा फायदा घेत घरात घुसुन तिच्यावर अत्याचार केला. पालक घरी आल्यानंतर मुलीने आईला सर्व हकीकत सांगितली. आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरूद्ध गेवराई पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री बाललैंगिक अंत्याचार ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. आरोपीस आज बीड येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड हे करित आहेत.