कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 18:55 IST2021-09-10T18:54:38+5:302021-09-10T18:55:41+5:30
आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला.

कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात
बीड : विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. ती गर्भवती असल्याचे कळाल्यावर महिनाभराच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. ही धक्कादायक घटना शहरात ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. यावरून गुन्हा नोंद झाला असून, आरोपी फरार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील गांधीनगरातील एका ३२ वर्षीय पीडित महिलेवर १४ फेब्रुवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान अमोल लक्ष्मण पौळे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याने वारंवार बळजबरीने अत्याचार केला. यातून पीडितेला गर्भधारणा झाली. याची माहिती होताच अमोल पौळे याने महिन्याच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला विश्वास दिला. त्यानंतर तिला बळजबरीने दोन गोळ्या खायला लावल्या. त्याच रात्री तिचा गर्भपात झाला. आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. पीडितेने ८ सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून अमोल पौळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?
आरोपी कुख्यात गुन्हेगार
या प्रकरणातील आरोपी अमोल पौळे हा अंबाजोगाईच्या गुन्हे विश्वातील कुख्यात गुंड आहे. त्याच्या सततच्या धमक्या व दबावामुळे पीडितेने तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही. काही महिन्यांपूर्वीच शहरातील एका तरुणाच्या खून प्रकरणात त्याचा समावेश होता.
हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा