अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळाची दाहकता दर दोन तीन वर्षांनी अनुभवणाऱ्या बीड शहरात मोठ्या इमारती आणि घरांची बांधकामे होत आहेत. मात्र टंचाईच्या काळात शाश्वत आधार देणाºया जलपुनर्भरणाकडे विविध कारणांमुळे दुर्लक्षच झाल्याचे दिसते. बांधकाम परवानगी घेताना नगर पालिकेकडून जलपुनर्भरणाची अट आहे. त्या अटींना अनुसरुन परवानगी दिली जाते. मात्र अनेक ठिकाणी जलपुनर्भरणाचा प्रयोग करण्याचे टाळले जात असल्याचे आकडेवारीवरुन दिसते.बीड शहर दिवसेंदिवस विस्तारत आहे. निवासी गरज म्हणून घरे, व्यापारी संकुल, दुकानांचे बांधकाम होत आहेत. शहरात गत पाच वर्षात जवळपास १५९४ बांधकामे झाली आहेत. त्यापैकी ४३२ घरे, व्यापारी संकुलांंमध्ये तसेच २१ शासकीय इमारतींमध्ये जलपुनर्भरण केले. अटींना आधीन राहून बांधकाम होते मात्र भोगवटा (पूर्णत्व) प्रमाणपत्र नेत नाहीत. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंगची माहिती यंत्रणेकडे उपलब्ध होण्यास अडचणी आहेत.जलबचतीबाबत सामाजिक उपक्रम, मोहीम, प्रोत्साहनामुळे तसेच सोशल मीडियामुळे जनजागृती होत आहे. त्यामुळे कुठलाही नियम, अट न पाहता अनेक जण स्वत: आपल्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असल्याचे सकारात्मक चित्र पाहवयास मिळत आहे.
बांधकामासाठी परवानगी मिळताच रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे होते दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:43 IST
दुष्काळाची दाहकता दर दोन तीन वर्षांनी अनुभवणाऱ्या बीड शहरात मोठ्या इमारती आणि घरांची बांधकामे होत आहेत.
बांधकामासाठी परवानगी मिळताच रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे होते दुर्लक्ष !
ठळक मुद्देबीड : अटींवर बोट दाखवत पालिका देते केवळ परवानगी; दुष्काळ, टंचाईमुळे जागरुकताही वाढली