राडी गावास बीबीएफ पेरणीचे आदर्श मॉडेल बनवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:52+5:302021-06-20T04:22:52+5:30
अंबाजोगाई : बीबीएफ यंत्र खरेदीत व पेरणीत राडी गाव या वर्षी जिल्ह्यात व राज्यात आदर्श मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन ...

राडी गावास बीबीएफ पेरणीचे आदर्श मॉडेल बनवणार
अंबाजोगाई : बीबीएफ यंत्र खरेदीत व पेरणीत राडी गाव या वर्षी जिल्ह्यात व राज्यात आदर्श मॉडेल ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी केले.
तालुक्यातील राडी येथे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण व बीबीएफवर सोयाबीन पेरणी प्रत्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेतावर प्रत्यक्षरित्या बीबीएफवर पेरणी करून घेतली. राडीतील शेतकऱ्यांचा उत्साह पाहून कृषी विभाग आपल्याला नेहमी मदत करेल व सेवेत राहील, असे मुळे म्हणाले. राडीतील शेतकऱ्यांची चळवळ पाहून इतर ही गावातील शेतकऱ्यांनी अवलोकन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी कृषी विभागाच्या कामाचे कौतुक केले. येथील कृषी सहायक किशोर आडगळे व तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांचे काम उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. कृषी सहायक सूर्यवंशी यांनी सोयाबीन लागवड ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन केले. राडी येथे पोकरा अंतर्गत १ कोटी रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने राडीकरांच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे व तालुका कृषी अधिकारी बर्वे यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच सुरेखा गंगणे, दत्तात्रय गंगणे, उपसरपंच बबन बनसोडे, रोहयोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गंगणे, चेअरमन मनोज गंगणे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, किसान काँग्रेसचे गणेश गंगणे, गणेश जाधव, बाबासाहेब लोमटे, सचिन गंगणे व इतर प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी सहायक किशोर अडगळे यांनी संचलन करून आभार मानले.
===Photopath===
190621\avinash mudegaonkar_img-20210616-wa0039_14.jpg