ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून केजमध्ये दोन गटात राडा; ६५ लोक ताब्यात

By सोमनाथ खताळ | Updated: March 24, 2023 11:37 IST2023-03-24T11:35:32+5:302023-03-24T11:37:47+5:30

एका धार्मिक स्थळासमोर गाणे वाजविल्याच्या कारणावरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली.

Rada in two groups in a cage from playing a song in a tractor; 65 people detained | ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून केजमध्ये दोन गटात राडा; ६५ लोक ताब्यात

ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून केजमध्ये दोन गटात राडा; ६५ लोक ताब्यात

केज : ट्रॅक्टरमध्ये गाणे वाजविण्यावरून दोन गटात दगडफेक झाली. रात्रभर दोन गटात हाणामारी झाली. यात जवळपास ६५ संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

रस्त्यावरून एक ट्रॅक्टर जात होते. एका धार्मिक स्थळासमोर गाणे वाजविल्याच्या कारणावरून तरुणांमध्ये बाचाबाची झाली. नंतर याचे रूपांतर दगडफेक व हाणामारी मध्ये झाले. शहरात तणाव झाल्याने रात्रीच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक कविता नेरकर, सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ व दंगल नियंत्रण पथक शहरात तळ ठोकून आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ६५ लोकांना ताब्यात घेतले आहे. अजूनही शहरात तणावाचे वातावरण आहे. चौकाचौकात फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत.

Web Title: Rada in two groups in a cage from playing a song in a tractor; 65 people detained