पालीमध्ये मशाल फेरीदरम्यान राडा

By Admin | Updated: August 22, 2016 01:31 IST2016-08-22T00:46:54+5:302016-08-22T01:31:31+5:30

बीड : तालुक्यातील पाली येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता काढलेल्या मशालफेरीदरम्यान राडा झाला. दोघांनी फेरीवर हल्ला केल्याने ग्रामसेवकासह तिघे जखमी झाले.

Rada during the torch round in Pali | पालीमध्ये मशाल फेरीदरम्यान राडा

पालीमध्ये मशाल फेरीदरम्यान राडा


बीड : तालुक्यातील पाली येथे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता काढलेल्या मशालफेरीदरम्यान राडा झाला. दोघांनी फेरीवर हल्ला केल्याने ग्रामसेवकासह तिघे जखमी झाले.
शासनाच्या आदेशानुसार ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत ठिकठिकाणी मशाल फेरी व गावकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत पाली येथे मशाल रॅली काढण्यात आली होती. यावेळी गावातीलच अतुल विठ्ठल नवले, अंकुश बापूराव नवले यांनी फेरी का काढता असे म्हणून शिवीगाळ करीत हल्ला चढविला. त्यात ग्रामसेवक श्रीराम वीर, प्रशिक्षक अशोक खरसाडे, ग्रा.पं. कर्मचारी गायकवाड हे जखमी झाले. याप्रकरणी ग्रामसेवक वीर यांनी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)

Web Title: Rada during the torch round in Pali