मोहम्मदिया कॉलनीतील रोहित्राचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:55+5:302021-06-28T04:22:55+5:30

शहरातील मोहम्मदिया कॉलनीमध्ये अनेक नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनेक वर्षांपासून नागरी सोयी-सुविधा नगर परिषदेकडून ...

The question of Rohitra in Mohammadia Colony is solved | मोहम्मदिया कॉलनीतील रोहित्राचा प्रश्न मार्गी

मोहम्मदिया कॉलनीतील रोहित्राचा प्रश्न मार्गी

शहरातील मोहम्मदिया कॉलनीमध्ये अनेक नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनेक वर्षांपासून नागरी सोयी-सुविधा नगर परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येत नाही. यात वीजपुरवठा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नाल्यांचे प्रश्न प्रमुख आहेत. यासाठी नगरसेवकांना अनेकदा आंदोलन, उपोषण करावे लागले. नगरसेवक हाफिज अशफाक यांनी दीड वर्षांपासून प्रभागात आवश्यक संख्येत डी.पी. आणि पथदिवे लावण्याची मागणी केली होती. या मागणीची महावितरण कंपनीकडून दखल घेण्यात आली असून, येथे एक रोहित्र बसवून देण्यात आले. या रोहित्रातून वीज कनेक्शन जोडून एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक यांच्या हस्ते बटन दाबून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी नगरसेवक हाफिज अशपाक, एजाज खन्ना, सय्यद सैफअली लालू यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

===Photopath===

270621\27_2_bed_9_27062021_14.jpg

===Caption===

बीड शहरातील मोहम्मदिया कॉलनीत बसवलेल्या रोहित्रातून वीजपुरवठा सुरू करताना एआयएमआयएम पक्षाचे  जिल्हाध्यक्ष शेख शफीक, नगरसेवक नगरसेवक हाफिज अशपाक आणि एजाज खन्ना, सय्यद सैफअली लालू यांच्यासह महावितरणचे कर्मचारी

Web Title: The question of Rohitra in Mohammadia Colony is solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.