धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:23+5:302021-07-01T04:23:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करावा, अशा मागणी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने समन्वयक ...

The question of Dhangar reservation should be presented in the convention | धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा

धनगर आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करावा

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करावा, अशा मागणी धनगर ऐक्य परिषदेच्यावतीने समन्वयक किशोर कोकरे यांनी एका पत्राव्दारे आमदार लक्ष्मण पवार यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

धनगर समाज गेली ७० वर्षे आपली मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारने जरी धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असेल तरी लोकप्रतिनिधी म्हणून धनगर समाजाच्या मागण्या स्वतः अधिवेशनात उपस्थित कराव्यात, असेही कोकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

...

..या आहेत मागण्या

धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणीचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा. जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना व मागील एक हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे एक हजार कोटी असे एकूण दोन हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे स्मारक आपल्या तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे, अशा धनगर समाजाच्या मागण्या आहेत, असेही कोकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: The question of Dhangar reservation should be presented in the convention