पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 00:18 IST2019-12-12T00:17:26+5:302019-12-12T00:18:40+5:30

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली.

Purnahuti Mahapuja says Shri Yogeshwari Margashi festival | पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

पूर्णाहुती महापूजेने श्रीयोगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सव सांगता

ठळक मुद्देयात्रेलाही भाविकांची गर्दी : हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता बुधवारी दुपारी एक वाजता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांच्या उपस्थितीत पूर्णाहुती व महापूजा झाली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. महापूजेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या.
योगेश्वरी देवीच्या भरलेल्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच रात्री निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. बुधवारी महोत्सवाची सांगता होमहवन व पूर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार संतोष रूईकर व कमल रूईकर यांनी महापूजा करून पूर्णाहुती टाकली. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अ‍ॅड. शरद लोमटे, गिरीधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, पूजा राम कुलकर्णी, गौरी जोशी यांच्यासह योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित उपस्थित होते.
या पूर्णाहुतीनंतर आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी योगेश्वरी देवीच्या यात्रेसाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. सायंकाळी ७ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली. ही पालखी मंडीबाजार, पाटील चौक, भट गल्ली, जैन गल्ली, गौंड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, कुत्तरविहीर मार्गे पुन्हा मंदिरात पोहोचली. पालखी सोबत आराधी भजनी मंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे, झांज पथक व शहरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधणारी ठरली.

Web Title: Purnahuti Mahapuja says Shri Yogeshwari Margashi festival