कड्यात १२ दुकानांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:39+5:302021-07-11T04:23:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडा : आष्टी तालुक्यात नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवार, रविवारी वीकेंड ...

कड्यात १२ दुकानांवर दंडात्मक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यात नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवार, रविवारी वीकेंड लाॅकडाऊन असतानादेखील दुकाने उघडी ठेवणाऱ्या १२ दुकानांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
आष्टी तालुक्यातील कडा येथे शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावीत. जेणेकरून वीकेंड लाॅकडाऊन काळात कोरोना संसर्ग वाढणार नाही असे आदेश स्थानिक ग्रामपंचायतीने काढलेले आहेत. पण शनिवारी शहरात फेरफटका मारला अनेक दुकाने उघडी आढळली. यावेळी तब्बल बारा दुकानदारांकडून २२ हजार रुपये दंड वसूल केला.
यावेळी तहसीलदार शारदा दळवी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, मंडलाधिकारी शेंदुरकर, कडा पोलीस चौकीचे पोलीस शिपाई मंगेश मिसाळ, बंडू दुधाळ यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी विठ्ठल भालेराव, सर्जेराव करांडे, संतोष जगताप, सचिन कर्डिले, किशोर कर्डिले उपस्थित होते. शहरभर फेरफटका मारून नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
100721\img-20210710-wa0453_14.jpg
आष्टी तालुक्यातील कडा येथे दंडात्मक कारवाई करताना पथक.