'अच्छे दिन'ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:34 IST2021-07-06T17:31:22+5:302021-07-06T17:34:25+5:30
NCP Protest : आंदोलकांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध केला.

'अच्छे दिन'ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
परळी : इंधन दरवाढीमुळे 'अच्छे दिन'ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. महिला आंदोलकांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध केला.
हे आंदोलन बीड जिल्हा परिषदेतील गटनेते अजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी करण्यात आले. युपीए सरकारच्या काळात घरगुती गॅसच्या किंमती ५०० रुपयांच्या आत असताना बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी चूल मांडून आंदोलन केले होते. मात्र, आता खासदार संसदेत महागाई विरोधात बोलत नाहीत, अशी टीका अजय मुंडे यांनी केली.
यावेळी रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात बाळासाहेब देशमुख, दीपक देशमुख, किशोर पारधे, माणिक फड, अय्युब पठाण, माऊली गडदे, सुरेश टाक, विजय भोईटे, गोपाळ आंधळे, राजाभाऊ पौळ, संजय फड, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, वैजनाथ बागवले, राजाखान पठाण, कुमार व्हाव्हरे, लालाखान, जयपाल लाहोटी, सरचिटणीस अनंत इंगळे, अजीज कच्ची, सय्यद सिराज, मोहनराव सोळंके, रामेश्वर कोकाटे, वसंत तिडके, राजेंद्र सोनी, भरत शिंदे, रवींद्र परदेशी, विनायक राठोड, दत्ता सावंत, शंकर कापसे, सुरेश नानवटे, माणिक सातभाई, भागवत मुंडे, मोहन मुंडे, कमलकिशोर सारडा, प्रा.रघुनंदन खरात, अल्ताफ पठाण, गफार काकर, बळीराम नागरगोजे, अमर रोडे, ज्ञानेश्वर होळंबे, अमित केंद्रे, बालाजी गित्ते, तुकाराम आघाव, महिला आघाडीच्या अन्नपूर्णाताई जाधव, संगीता धुमाळ, चित्राताई देशपांडे, अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोईटे आदींचा सहभाग होता.