बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; मुंबईच्या तीन मुलींची सुटका
By सोमनाथ खताळ | Updated: July 24, 2023 22:34 IST2023-07-24T22:33:40+5:302023-07-24T22:34:15+5:30
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बीडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; मुंबईच्या तीन मुलींची सुटका
सोमनाथ खताळ, बीड : शहरातील मोंढा चौकातील गजबजलेल्या भागात स्पा सेंटरच्या नावाखाली कुंडणखाणा चालविला जात होता. याच ठिकाणी धाड मारून तीन अविवाहित मुलींची सुटका करण्यात आली. तसेच मालकासह व्यवस्थापकाविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मोंढा कॉर्नरलाच एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. मंबईच्या अविवाहित मुलींना बीडला आणत त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी रात्री ८ वाजता अचानक धाड मारून ही कारवाई केली. यातील मालक व व्यवस्थापक दोघेही फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्वेता खाडे, हवालदार आतिष देशमुख, अशोक नामदास, ढगे, संतराम थापडे, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण आदींनी केली.