वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन पीडितांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:31+5:302021-08-12T04:37:31+5:30

बीड : शहरातील पालवण चौकाजवळील नाथनगर भागात राजरोस सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. ...

Prostitution exposed, two victims released | वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन पीडितांची सुटका

वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन पीडितांची सुटका

बीड : शहरातील पालवण चौकाजवळील नाथनगर भागात राजरोस सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली. यावेळी आंटीला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, एएचटीयूच्या पथकाने संयुक्तपणे ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ही कारवाई केली.

नाथनगर भागात शकुंतला सुरेश राऊत (४५) ही स्वत:च्या घरातून महिलांकरवी वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील (एएचटीयू) अधिकारी व अंमलदारांना सोबत घेऊन सायंकाळी पावणेपाच वाजता सापळा लावला. दोन डमी ग्राहकांकडे प्रत्येकी एक हजार रुपये देऊन पाठविले. डमी ग्राहकांनी घरात प्रवेश करून इशारा केल्यावर अधिकारी व अंमलदार तेथे पोहोचले. त्यांनी ३२ व २२ वर्षीय दोन पीडितांसह आंटी शकुंतला राऊत हिला ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात शकुंतला राऊतविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, विशेष पथक प्रमुख विलास हजारे, एएचटीयूचे प्रमुख उपनिरीक्षक शिवाजी भारती, हवालदार प्रताप वाळके, सुरेखा उगले, सतीश बहिरवाळ, नीलावती खटाणे, विकास नेवडे यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे तपास करत आहेत.

....

फोनवरून ठरला व्यवहार

पोलिसांना कुंटणखान्याबाबत माहिती मिळाल्यावर शकुंतला राऊतला कॉल केला असता तिने फोनवरच किती पैसे लागतील, कुठे व कधी यायचे, हे सांगितले. त्यामुळे पाेलिसांना खात्री पटली. डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

.....

Web Title: Prostitution exposed, two victims released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.