जय भवानी साखर कारखान्यात ३ लाख १५ हजार पोती साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:37+5:302021-02-26T04:46:37+5:30

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी ...

Production of 3 lakh 15 thousand bags of sugar in Jay Bhavani Sugar Factory | जय भवानी साखर कारखान्यात ३ लाख १५ हजार पोती साखरेचे उत्पादन

जय भवानी साखर कारखान्यात ३ लाख १५ हजार पोती साखरेचे उत्पादन

गेवराई : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिवाजी नगर या साखर कारखान्यात यंदाच्या गाळप हंगामात माजी आमदार तथा चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ११५ दिवसांमध्ये तीन लाख १५ हजार ८५ पोत्यांचे उत्पादन केले. ३ लाख ३० हजार २२० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी १०.८७ व साखर उतारा ९.६२ याप्रमाणे जय भवानी सहकारी साखर कारखान्याने २०२०-२१ ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ही कामगिरी केली आहे.

कारखान्यात प्रतिदिन तीन हजार ते साडेतीन हजार उसाचे गाळप होत आहे चालू हंगामामध्ये उपपदार्थ प्रकल्पातील ३४ लाख ५६ हजार २५० लिटर अल्कोहोल निर्मिती झाली असल्याची माहिती जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी दिली. ऊस वाहतूकीसाठी बारकोड प्रणाली

चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वजन काट्यावर होणारी जामिंग रोखण्यासाठी बारकोड प्रणालीचा वापर केला आहे. या प्रयोगामुळे ऊस वाहतूकीत होणाऱ्या अनागोंदीला शिस्त लागली आहे. गाळप हंगामात उस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून वजन काट्यांवर आपला नंबर आधी लागून लवकर रिकामे व्हावे यासाठी मोठी ओढाताण होते. यातून उस वाहतूकदारांमध्ये लहान मोठे वाद निर्माण होत होते. त्यातून इतर वाहनांची वजनाअभावी कोंडी होउन वेळ जात होता. हा प्रकार रोखण्यासाठी कारखान्याने उस पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी अत्याधुनिक बारकोड यंञणा राबविण्याचे ठरविले. कारखान्यामध्ये उसाचे वजन काटे सीसीटीव्हीच्या निगराणीत आहेत. शंका आली तर तिथे वजनाची मानके ठेवण्यात आली आहेत. बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीला शिस्त लागून वजनासाठी होणारी

ओढाताण वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप सुरू आहे, असे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले

Web Title: Production of 3 lakh 15 thousand bags of sugar in Jay Bhavani Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.