कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 20:06 IST2025-05-09T20:02:12+5:302025-05-09T20:06:16+5:30

परतीचा मार्ग ठरला मृत्यूचा; पोटात जुळे बाळ अन् कामासाठी रायगडहून गेवराईला; १९ वर्षीय गर्भवतीचे रस्त्यातच संपले आयुष्य

Pregnant woman, only 19 years old and carrying twins, dies on the road before giving birth | कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य

कामासाठी रायगडहून गेवराईला; वय फक्त १९, पोटात जुळे बाळ अन् रस्त्यातच संपले आयुष्य

बीड : वय अवघे १९ आणि पोटात दोन बाळ. अचानक पोटात दुखायला लागल्याने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून बीडला रेफर केले. परंतु, जिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वीच गर्भवतीचा रस्त्यातच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. आरोग्य विभागाने याची नोंद घेतली असून, याचे अन्वेषण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गर्भवती ही कामासाठी रायगड जिल्ह्यातून गेवराई तालुक्यात दीड महिन्यापूर्वी आल्याची प्राथमिक माहिती आहे.

गौरी हिरामन भोवी (वय १९, रा. खोपोली, जि. रायगड) असे मयत गर्भवतीचे नाव आहे. ती पती व इतर काही लोकांसह कामाच्या शोधात गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, गुळज येथे आली होती. साधारण दीड महिन्यापासून ती गेवराईत आली होती. ती पहिल्यांदाच गर्भवती होती. तिची प्राथमिक तोंडी माहिती घेतली असता जुळे मुले असल्याचे सांगण्यात आले होते. ३६ आठवड्यांचा गर्भ झाल्यानंतर ५ मे रोजी सकाळी तिच्या पोटात अचानक दुखायला सुरूवात झाली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने तिला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून प्रथमोपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले. परंतु, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. बीडमध्ये आल्यावर डॉक्टरांनी तपासून गौरी यांना मयत घोषित केले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले.

बीपी वाढला, झटकेही आले
गौरीने बीड जिल्ह्यात आल्यानंतर कोठेही सोनोग्राफी अथवा इतर आरोग्य तपासणी केली नसल्याचा अहवाल आरोग्य विभागाला आला आहे. परंतु, सोमवारी तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा बीपी वाढला होता, शिवाय पायावर सुज आणि झटकेही येत होते. यातच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता मातामृत्यू अन्वेषण समितीकडून याची चौकशी होणार आहे.

रस्त्यातच गर्भवतीचा मृत्यू
गेवराईहून बीड जिल्हा रुग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यातच एका गर्भवतीचा मृत्यू झाला, हे खरे आहे. या मृत्यूचे अन्वेषण केले जाणार आहे.
- डॉ.सचिन शेकडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी बीड.

Web Title: Pregnant woman, only 19 years old and carrying twins, dies on the road before giving birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.