केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली, गाय, म्हशीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:08+5:302021-05-10T04:34:08+5:30

केज : शहरासह, तालुक्यात रविवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. यावेळी दोन ठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडली. यात शेतात बांधलेल्या ...

Power outage in Cage taluka | केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली, गाय, म्हशीचा मृत्यू

केज तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली, गाय, म्हशीचा मृत्यू

केज : शहरासह, तालुक्यात रविवारी दुपारी अवकाळी पाऊस झाला. यावेळी दोन ठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडली. यात शेतात बांधलेल्या एका गायीचा व म्हशीचा मृत्यू झाला.

केज शहरासह तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना करत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले होते तर शहरातील रस्त्यांवरही पाणीच पाणी झाले होते.

तालुक्यातील लाडेवडगाव येथील विष्णू ज्ञानोबा लाड यांची गाय वीज पडून मरण पावली तर मोटेगाव येथील भाऊराव विठोबा पौळ यांची शेतात झाडाला बांधलेली म्हैस वीज पडल्याने मरण पावल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी दिली. दरम्यान, अचानक जोरदार वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील आंब्याचे व मका पिकाचे नुकसान झाल्याची माहिती अरुण करपे या शेतकऱ्याने दिली.

Web Title: Power outage in Cage taluka