जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:42+5:302021-06-02T04:25:42+5:30

.... उलाढाल मंदावली ; उपासमारीची वेळ अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, यांची ...

Poor condition of Zilla Parishad school building | जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची दुरवस्था

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीची दुरवस्था

....

उलाढाल मंदावली ; उपासमारीची वेळ

अंबाजोगाई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, यांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे अनेक छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील आठवडे बाजार बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतीमाल शेतातच पडून आहे. भाजीपाल्याची लागवड केली असली तरी बाजार बंदमुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.

.....

लोंबकळणाऱ्या तारांचा धोका

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये विद्युत तारा मोठ्या प्रमाणात लोंबकळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी वर्षानुवर्षे दुर्लक्ष करीत असल्याने या तारांचा धोका वाढला आहे. दोन पोलमध्ये असणारे मोठे अंतर यामुळे या तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. अतुल देशपांडे यांनी केली आहे.

....

गुटख्याची चोरून विक्री

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पानटपऱ्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पानटपऱ्या बंद असल्या तरी चोरट्या मार्गाने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाल्याची विक्री सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुम्रपान घातक असल्याने शासनाने हा निर्णय घेतला असला तरी ग्राहक मात्र, गुटखाबंदीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

....

Web Title: Poor condition of Zilla Parishad school building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.