बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:49 IST2017-12-27T00:49:09+5:302017-12-27T00:49:14+5:30
पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी बीड जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.

बीडमध्ये १६२ पैकी १५७ ग्रा.पं.साठी शांततेत मतदान; पाच बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर दुस-या टप्प्यातील १६२ पैकी १५७ ग्राम पंचायतसाठी मंगळवारी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सायंकाळपर्यंत सरासरी ८५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त तैनात होता.
जानेवारी व फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार दूसºया टप्प्यात जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत १६४ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामुळे १४८८ सरपंच व सदस्यांच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान मंगळवारी झाले. सकाळी सात वाजेपासूनच केंद्रांवर हक्क बजावण्यासाठी मतदारांची गर्दी दिसून आली. दरम्यासन, या निवडणुकीत चार ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. तर दोन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत.
नेकनूरमध्ये गोंधळ
बीड तालुक्यातील नेकनुर येथील मतदान केंद्रावरील एका मशीनमध्ये सकाळी बिघाड झाली होती. त्यानंतर तात्काळ निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी धाव घेत यंत्र दुरूस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. दरम्यानच्या काळात थोडा गोंधळ उडाला होता. तसेच धारुर तालुक्यातील गोपाळपूर येथे संथगतीने प्रक्रिया चालल्याने रात्री ७ वाजेपर्यंत मतदान सुरू होते तर भोगलवाडी, हिंगणा येथे मतदान यंत्र बंद पडले होते. तसेच आडसमध्येही उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
आष्टीत जास्तमतदान
आष्टी तालुक्यात चार ग्रा.पं.साठी सार्वाधिक ८१ टक्के (दुपारी साडेतीन पर्यंत) मतदान झाले. तर धारूर तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी केवळ ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण ६९.३७ टक्के एवढे मतदान झाले होते.
तरूणांचा उत्साह
आपला हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाºया तरूणांची गर्दी दिसून आली. त्यांचा उत्साह चेहºयावर स्पष्ट दिसत होता. तर वृद्धांनीही नातेवाईकांचा आधार घेत मतदान केले.
चोख बंदोबस्त
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी प्रत्येक केंद्राचा आढावा घेत होते.