- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून बीड जिल्हा चर्चेत आला, तसेच काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सामाजिक, राजकीय नेत्यांनी आरोप केले. त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यात काम करण्यास पोलिसांनी नकारघंटा दर्शवली आहे. बीड नको, दुसरीकडे बदली करा, असे विनंती अर्ज जिल्ह्यातील १७२ पैकी १०७ अधिकाऱ्यांनी महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे केले आहेत. यात २९ पैकी १५ ठाणेदारांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात २९ पोलिस ठाणे आहेत. यामध्ये उपनिरीक्षक ते डीवायएसपी अशा १८८ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून पैकी १७२ सध्या कार्यरत आहेत. ३० लाख लोकांच्या सुरक्षेसाठी हे मनुष्यबळ अगोदरच कमी आहे. त्यातच अनेक नेत्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. त्यामुळेच जिल्ह्यातील अधिकारी आता बीड नको म्हणून विनंती अर्ज करून बदली मागत आहेत.
महासंचालकांकडे किती आले विनंती अर्ज ?परिक्षेत्रात ८ वर्षे सेवा पूर्ण झालेले सहायक पोलिस निरीक्षक ४पोलिस उपनिरीक्षक ५विनंती अर्ज : डीवायएसपी २, पोलिस निरीक्षक १०, सहायक पोलिस निरीक्षक १५, पोलिस उपनिरीक्षक १६तांत्रिक पोलिस अधिकारी : पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक ३महामार्ग पोलिस अधिकारी :सहायक पोलिस निरीक्षक १, पोलिस उपनिरीक्षक २विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे विनंती अर्ज : जिल्ह्यात ४ वर्षे पूर्ण, पोलिस निरीक्षक २, सहायक पोलिस निरीक्षक ७, पोलिस उपनिरीक्षक ६विनंती अर्ज : पोलिस निरीक्षक ६, सहायक पोलिस निरीक्षक ८, पोलिस उपनिरीक्षक १९कुणाकडे किती विनंती अर्ज? : महासंचालक ५९, विशेष पोलिस महानिरीक्षक ४८