बिंदुसरा धरण आटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:47 IST2019-05-12T00:46:18+5:302019-05-12T00:47:05+5:30
बीड : बीड शहराला माजलगाव बॅक वॉटर योजना आणि बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे बिंदुसरा ...

बिंदुसरा धरण आटले
बीड : बीड शहराला माजलगाव बॅक वॉटर योजना आणि बिंदुसरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे बिंदुसरा धरण आटले आहे. बिंदुसरा धरणातून बीड शहराला दररोज ८ लाख लिटर पाणीपुरवठा होत होता. सध्या मात्र दीड ते दोन लाख लिटर पाणी कसरत करुन पुरवठा करावा लागत आहे. धरणात चर खोदता येत नाही, गाळात वाहने फसतात, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.