सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:22 IST2021-02-19T04:22:27+5:302021-02-19T04:22:27+5:30

बीड : येथील सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य ...

Plantation, Essay and Eloquence Competition in Military School | सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा

सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा

बीड : येथील सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य ए. एस. डाके यांनी दिली.

सैनिकी विद्यालयांमध्ये बुधवारी विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये प्रामुख्याने सैनिकी विद्यालयाच्या परिसरात प्राचार्य ए. एस. डाके, सैनिकी निर्देशक तथा माजी सैनिक मेघराज कोल्हे, फुलचंद गायकवाड व विजयकुमार धारणकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धा ही यावेळी घेण्यात आल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक मेहबूब पठाण, प्रा. रवींद्र झोडगे, प्रा. रमेश कांबळे, श्री. गणेश निर्मळ व शिवाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मिलिंद शिवणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना वही , पेन व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालासाहेब क्षीरसागर, आभार प्रदर्शन गौतम खेमाडे यांनी केेले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Plantation, Essay and Eloquence Competition in Military School