कचऱ्याचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:35+5:302021-07-18T04:24:35+5:30
खड्ड्यांमुळे त्रास वाढला अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, ...

कचऱ्याचे ढिगारे
खड्ड्यांमुळे त्रास वाढला
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव, अशा अनेक रस्त्यांवर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे वाहनांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
दुचाकी चोऱ्या वाढल्या
बीड : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या चोरींना आळा घालण्याची मागणी आहे.
स्वच्छतागृहाची दुरवस्था
चौसाळा : येथील बसस्थानकातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असून, यामुळे स्वच्छता करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. मात्र आगाराचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
झाडांची कत्तल
धारुर : तालुक्यातील अनेक भागांमधून झाडांची कत्तल बेसुमार केली जात आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे. मात्र, परवानगी न घेता झाडे तोडण्यावर भर दिला जात आहे.