धनादेश न वठल्याने प्राध्यापकाला शिक्षेसह दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:34+5:302021-07-30T04:34:34+5:30

बीड : बांधकाम साहित्य खरेदी केल्यानंतर दिलेला धनादेश न वठल्याने दाखल प्रकरणात प्रा. बाळासाहेब दगडू लाखे यांना दोषी ठरवून ...

Penalty with punishment for non-receipt of check | धनादेश न वठल्याने प्राध्यापकाला शिक्षेसह दंड

धनादेश न वठल्याने प्राध्यापकाला शिक्षेसह दंड

Next

बीड : बांधकाम साहित्य खरेदी केल्यानंतर दिलेला धनादेश न वठल्याने दाखल प्रकरणात प्रा. बाळासाहेब दगडू लाखे यांना दोषी ठरवून एक महिना कारावासाची शिक्षा व धनादेशाची रक्कम तसेच २० हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. सोनटक्के यांच्या न्यायालयाने दिला. लाखे यांनी बांधकाम साहित्याचे व्यापारी प्रशांत राजमल बोरा यांच्याकडून १ लाख ५ हजार ५१२ रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. त्यावेळी ४५ हजार ५१२ रुपये नगदी व उर्वरित रकमेचा धनादेश दिला होता. मात्र, धनादेश न वठल्याने बोरा यांनी ॲड. सागर नाईकवाडे यांच्यामार्फत न्यायालयात फौजदारी प्रकरण दाखल केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा पुरावा नोंदवून व कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करून आरोपीला दोषी ठरवून उपरोक्त निर्णय दिला.

Web Title: Penalty with punishment for non-receipt of check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.