रबी हंगामात बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार शेतकºयांनी काढला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:46 AM2018-01-06T00:46:15+5:302018-01-06T00:46:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार १२२ शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला ...

Peakima has collected 1,4 42 thousand farmers in Beed district during Rabi season | रबी हंगामात बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार शेतकºयांनी काढला पीकविमा

रबी हंगामात बीड जिल्ह्यात १ लाख ४२ हजार शेतकºयांनी काढला पीकविमा

googlenewsNext
ठळक मुद्दे७ कोटी १९ लाख ४६ हजार ६५० रुपयांचा हप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार १२२ शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला असून, सुमारे ७ कोटी १९ लाख ४६ हजार ६५० रुपयांचा हप्ता भरणा केला आहे.
नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण म्हणून शेतकºयांसाठी पंतप्रधान पीकविमा योजना आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये शासनाच्या आदेशानुसार १ डिसेंबरपासून शेतकºयांनी रबी हंगामातील पिकांचा विमा काढण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी, कृषी विभागाने विविध पातळीवर पीकविमा वेळेत भरणा करण्याचे आवाहन केले होते. १ जानेवारी २०१८ पर्यंत पीकविमा काढण्याची मुदत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ राष्ट्रीयीकृत तसेच महाराष्ट्र ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच सेवा केंद्रामार्फतही शेतकºयांनी पीकविम्याचा हप्ता भरला. यात ६ हजार ६९१ कर्जदार शेतकरी तसेच १ लाख ३५ हजार ४३१ बिगर कर्जदार शेतकºयांनी रबी हंगामात पीकविमा काढला आहे.
खरीप हंगामातील पीकविमा काढताना शेतकºयांना त्रास झाला होता, तर प्रशासनावर ताण आला होता. मागील अनुभव लक्षात घेत सुधारणेमुळे रबी हंगामात मात्र तसा अनुभव आला नाही.

Web Title: Peakima has collected 1,4 42 thousand farmers in Beed district during Rabi season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.