वावटळीने मंडप उडाला; २० व-हाडी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:15 IST2019-05-08T00:13:35+5:302019-05-08T00:15:53+5:30
विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला.

वावटळीने मंडप उडाला; २० व-हाडी जखमी
कडा : विवाह सोहळ्याला अवघ्या काही मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात मोठी वावटळ आली आणि मंडपात घुसली. यामुळे पूर्ण मंडप उडाला. लाकडी, लोखंडी अँगल अंगावर पडल्याने २० ते २५ व-हाडी जखमी झाले. ही घटना आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
आष्टी तालुक्यातील आनंदवाडी येथील चौधरी वस्तीवर मंगळवारी दुपारी चौधरी आणि झांबरे यांचा विवाह सोहळा होता. लग्नाला काही मिनिटांचा अवधी असल्याने आलेले पाहुणे व वºहाडी लग्न मंडपात बसले होते. अचानक दोनच्या सुमारास जोरात वावटळ आली. ती मंडपात घुसल्याने मंडप उडाला आणि सगळी दाणादाण झाली. यातील लाकडी बल्ली अंगावर पडल्याने अनेक वºहाडी जखमी झाले. त्यांना तात्काळ कडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान शुभकार्यात वावटळीने अडथळा आणल्याने व-हाडी मंडळाच्या भोजनाचीही थोड्या फार प्रमाणात गैरसोय झाली होती.
जखमींत या व-हाडींचा समावेश
छबू मारूती घुले, सुशीला राजेंद्र साके, मथुरा निवृत्ती कर्डिले, नंदाबाई कोंडिबा झांबरे, नवनाथ नामदेव शिंदे, पद्माबाई साके, जनाबाई अंबादास पांडुळे, लहू दशरथ गांगर्डे, वैशाली संदीप गोरे, वैशाली तरटे, रमेश बोडखे, मथुराबाई गांगर्डे, संगीता संजय बोडखे, यमुना बबन झांबरे, शिवानी अंकुश गुंड, अश्विनी शिंदे, रावसाहेब गजघाट आदींचा जखमींत समावेश आहे. या जखमींवर कड्यासह नगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंडप उडाल्याने लग्न लावले मंदिरात
नियोजित ठिकाणी दिलेला मंडप लग्न लागण्याच्या अगोदरच उडाल्याने मोठ्या प्रमाणावर दाणादाण झाली होती. परत लगेच दुरूस्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे बाजूच्या मंदिरात लग्न सोहळा पार पडला.