शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्येचा वेग मंदावला; पण मृत्युसत्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

जिल्ह्यातील ४ हजार २०० संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ५१६ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर ३ हजार ...

जिल्ह्यातील ४ हजार २०० संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ५१६ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर ३ हजार ६८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाईचे १८, आष्टी ५७, बीड २१८, धारुर १४, गेवराई ४९, केज २२, माजलगाव २६, परळी ६, पाटोदा ५८, शिरुर २६ आणि वडवणी तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. दिवसभरात ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

दरम्यान, मागील २४ तासात जिल्ह्यात १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कोळपिंप्री (ता. धारुर) येथील ६४ वर्षीय पुरुष, डिग्रस (ता. परळी) येथील ८५ वर्षीय पुरुष, हिवरापहाडी (ता. बीड) येथील २० वर्षीय पुरुष, मांडवा (ता. परळी) येथील ६० वर्षीय पुरुष, पिंप्री (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, गुरुवारपेठ अंबाजोगाई येथील ५७ वर्षीय पुरुष, जानेगाव (ता. केज) येथील ६२ वर्षीय पुरुष, तांबवा (ता. केज) येथील ९० वर्षीय पुरुष, टाकरवण (ता. माजलगाव) येथील ५० वर्षीय महिला, बीड शहरातील ६७ वर्षीय महिला, आष्टी शहरातील ६० वर्षीय महिला, परळी शहरातील ४५ वर्षीय पुरुष, केज येथील ५५ वर्षीय पुरुष व माऊलीनगर बीड येथील ६४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ५७१ इतकी झाली आहे. पैकी ७९ हजार ८४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत १९७७ जणांचा बळी गेला आहे. सध्या ४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जि. प. सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.