पीक स्पर्धेत सहभागी व्हा : मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST2021-07-29T04:32:29+5:302021-07-29T04:32:29+5:30
बीड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीत धान्य पिके सन २०२१-२२ खरीप हंगाम पीक स्पर्धा अर्ज भरण्यासाठी आवाहन ...

पीक स्पर्धेत सहभागी व्हा : मुळे
बीड : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य व गळीत धान्य पिके सन २०२१-२२ खरीप हंगाम पीक स्पर्धा अर्ज भरण्यासाठी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जी. मुळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यात पीक स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. चालू वर्षात खरीप हंगाम २०२१ मध्ये राज्यातील भात, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन सूर्यफूल व भुईमूग या प्रमुख पिकांच्या पीक स्पर्धा राबविण्यात येत आहे, त्या अनुषंगाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व गळीत धान्य पिके अंतर्गत जिल्ह्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील अधीक्षक कृषी अधिकरी डी. जी. मुळे यांनी केले आहे.