परळीत पोलिसाच्या विशेष पथकाने पकडला ४० पोते गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 16:11 IST2018-03-14T15:47:14+5:302018-03-14T16:11:35+5:30
टोकवाडीमार्गे शहरात येणाऱ्या एका ट्रकवर आज पहाटे कारवाई करत पोलिसाच्या विशेष पथकाने ४० पोते गुटखा पकडला.

परळीत पोलिसाच्या विशेष पथकाने पकडला ४० पोते गुटखा
परळी (बीड ) : टोकवाडीमार्गे शहरात येणाऱ्या एका ट्रकवर आज पहाटे कारवाई करत पोलिसाच्या विशेष पथकाने ४० पोते गुटखा पकडला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक नरहारी नागरगोजे, सखाराम पवार, बाबासाहेब आचार्य, सचिन सानप यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, लातूर - पुणे मार्गावर रोजची वाहतूक करणारा एक आयशर टेम्पो (एमएच- २५- यु-१०४९) आज पहाटे टोकवाडी मार्गे शहराकडे येत होता. या वाहनात अवैधरीत्या गुटखा वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसाच्या विशेष पथकाला मिळाली होती. यावरून या वाहनाची झडती घेतली असता त्यात ४० पोते गुटखा आढळून आला. याबाबत अन्न व भेसळ अधिकारी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले.