परळीत किरकोळ कारणावरून युवकाची मित्रानेच गळा चिरून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:41 IST2018-12-04T17:40:53+5:302018-12-04T17:41:49+5:30
याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे.
_201707279.jpg)
परळीत किरकोळ कारणावरून युवकाची मित्रानेच गळा चिरून केली हत्या
बीड : पार्टीसाठी घराबाहेर पडलेल्या युवकाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील नंदागौळ शिवारात सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी एकावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी फरार आहे.
शेख मकदुम शेख कलंदर (२८ रा.बरगतनगर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेख समीर वली (रा.बरकतनगर) असे आरोपीचे नाव आहे. मकदुम व समीर हे दोघे मित्र आहेत. एकमेकांच्या घरी दोघांचीही ये-जा होती. सोमवारी ते पार्टीसाठी बाहेर गेले होते. दोघांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून समीरने आपल्याजवळील धारदार शस्त्राने मकदुमवर वार केला. यामध्ये जमिनीवर कोसळला. त्यानंतर मकदुमचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात मकदुमला सोडून समिरने तेथून पलायन केले. हा प्रकार काही नागरिकांनी परळी ग्रामीण पोलिसांना सांगितला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून उपजिल्हा रूग्णालयात मृतदेह आणला. मध्यरात्रीच्या सुमारास मकदुमचा भाऊ शेख मुस्ताफा यांच्या फिर्यादीवरून समिरवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मारूती शेळके हे करीत असून अद्याप आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, ‘तु माझ्या घरात हस्तक्षेप का करतो’ या कारणावरून त्या दोघांमध्ये नेहमी वाद होते. यातूनच हा प्रकार झाल्याची फिर्याद शेख मुस्ताफा यांनी परळी ग्रामीण ठाण्यात दिली आहे.