परळीत शिवसेनेने बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार कदमच्या प्रतिमेची गाढवावरून काढली धिंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:27 IST2018-09-06T18:26:14+5:302018-09-06T18:27:02+5:30
बेताल वक्तव्य करणाऱ्या घाटकोपर येथील भाजप आमदार राम कदम यांचा परळी शिवसेनेच्यावतीने आज निषेध करण्यात आला.

परळीत शिवसेनेने बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार कदमच्या प्रतिमेची गाढवावरून काढली धिंड
परळी (बीड ) : स्त्रियांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या घाटकोपर येथील भाजप आमदार राम कदम यांचा परळी शिवसेनेच्यावतीने आज निषेध करण्यात आला. यावेळी आक्रमक आंदोलकांनी आमदार कदम यांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढली.
संतप्त आंदोलकांनी यावेळी भाजप आमदार कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात शहर प्रमुख राजेश विभूते, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक अतुल दुबे, युवासेना तालुका युवा अधिकारी व्यंकटेश शिंदे, अभयकुमार ठक्कर, राजा पांडे, रमेश चौंडे, अभिजित धाकपाडे, मोहन राजमाने, संतोष चौधरी, कृष्णा सुरवसे, अतुल शिंदे, सोमनाथ शहाणे आदींचा सहभाग होता.