शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:13 AM

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.जिल्ह्यातील विविध खात्याच्या विकास कामांचा आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत ...

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

जिल्ह्यातील विविध खात्याच्या विकास कामांचा आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

रेल्वेमार्गाच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, या मार्गासाठीचे १३३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले असून, जवळपास ३७६ कोटी रुपयांचा मावेजाही अदा करण्यात आला आहे. २०१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन काही तांत्रिक कारणामुळे, जमिनीच्या कोर्ट कचेऱ्यातील वादामुळे बाकी आहे. हे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे, असे त्या म्हणाल्या. या मार्गासाठी आवश्यक तेवढे भूसंपादन झाले असून, अतिरिक्त जागेची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या ६० वर्षांपासूनचे बीड जिल्ह्याचे हे स्वप्न असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या संदर्भात संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्यस्तरावरील बहुतांश अडचणी दूर केल्या असून, केंद्रस्तरावरील प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्याशी चर्चा करून या कामास गती देणार, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सोलापूर-धुळे या राष्टÑीय महामार्गाचे जिल्ह्यात ७८ कि.मी. लांबीचे काम आहे. हे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या मार्गाचेही १०० टक्के भूसंपादन झाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.बिंदुसरेवरील पूल १० जुलैपर्यंत पूर्ण होणारबीड शहरातून वाहणाºया बिंदूसरा नदीवरील पूल वाहून गेला होता. याठिकाणी उभारण्यात येणाºया नवीन पुलाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, येत्या १० जुलैपर्यंत हे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पुलाच्या बाबतीत अनेकांनी राजकारण केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडा