गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भजनात लीन; स्वतः रक्तदान करून केले अनेकांना प्रेरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 18:35 IST2020-12-12T18:25:24+5:302020-12-12T18:35:41+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेत गोपीनाथ गडावर १२ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे भजनात लीन; स्वतः रक्तदान करून केले अनेकांना प्रेरित
परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच अनेकांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गडावर गर्दी केली. यावेळी येथील शिबिरात सहभागी होत पंकजा मुंडे यांनी स्वतः रक्तदान करत अनेकांना प्रेरित केले. यानंतर वारकऱ्यांसोबत हातात टाळ घेऊन त्या भजनात लीन झाल्याचे पहावयास मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा घेत गोपीनाथ गडावर १२ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून अनेकांनी गर्दी केली होती.
पंकजा मुंडे यांनी सर्व उपक्रमांची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वतः रक्तदान केले. त्यांच्या समवेत माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यावेळी वारकऱ्यांनी भजनाचे सादरीकरण केले. यामुळे वातावरण भारावून गेले होते. पंकजा मुंडेसुद्धा यावेळी टाळ हातात घेत भजनात सहभागी झाल्या आणि भजनात लीन झाल्या.