पंकजा मुंडेंचा 'दसरा मेळावा' गडाच्या पायथ्याशी
By Admin | Updated: October 10, 2016 22:38 IST2016-10-10T22:38:02+5:302016-10-10T22:38:02+5:30
कजा मुंडे यांचा दसरा मेळावा यंदा भगवानगडावर नव्हे तर गडाच्या पायथ्याशी होणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने परवाणगी दिली आहे.

पंकजा मुंडेंचा 'दसरा मेळावा' गडाच्या पायथ्याशी
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १० - पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा यंदा भगवानगडावर नव्हे तर गडाच्या पायथ्याशी होणार आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने परवाणगी दिली आहे. यामुळे पंकाजा मुडे यांना दिलासा मिळाला असला तरी गडावर प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केल्याने भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडीत झाली आहे.
हेलिपॅड परिसरात पंकजा मुंडेंना सभेला परवानगी मिळाली आहे. गडाच्या मालकीच्या जागेशिवाय अन्यत्र सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडाच्या पायथ्याशी गेट नंबर २२ वर पंकजायांची सभा होणार आहे.