पंकजा मंडे पॉझिटिव्ह, धनंजय मुंडे यांनी दिला धीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:43 IST2021-04-30T04:43:14+5:302021-04-30T04:43:14+5:30

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंडे ...

Pankaja Monday positive, Dhananjay Munde gave patience | पंकजा मंडे पॉझिटिव्ह, धनंजय मुंडे यांनी दिला धीर

पंकजा मंडे पॉझिटिव्ह, धनंजय मुंडे यांनी दिला धीर

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंडे यांनी बुधवारी स्वत: व्टीट्‌ करुन दिली आहे.काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी बीडच्या भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनाही कोरोनासदृश्य लक्षणे दिसत होती. त्यामुळेही त्याही घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही कोरोनाही लागण झाली आहे.

दरम्यान, ताई काळजी घ्या, आराम करा, मोठा भाऊ म्हणून या प्रसंगात मी कायम सोबत आहे, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना धीर दिला आहे. संकटावर मात करुन आपण निश्चतच बाहेर पडाल, असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.

मी गेल्या काही दिवसापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ब-याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याचवेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच काळजी घ्या, असे व्टीटमध्ये म्हटले आहे.

Web Title: Pankaja Monday positive, Dhananjay Munde gave patience