परळीत २३ लाखांचा गुटखा पकडला, मात्र विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:50 IST2019-08-11T23:48:44+5:302019-08-11T23:50:46+5:30

शुक्रवारी पोलिसांनी येथील गुटखा पुरवठादार व्यापारी ईश्वरप्रसाद लाहोटी यांचा २३ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पकडल्याने खळबळ माजली आहे.

A paltry sum of Rs | परळीत २३ लाखांचा गुटखा पकडला, मात्र विक्री सुरूच

परळीत २३ लाखांचा गुटखा पकडला, मात्र विक्री सुरूच

ठळक मुद्देपुरवठादार व्यापारी फरार : कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

परळी : शुक्रवारी पोलिसांनी येथील गुटखा पुरवठादार व्यापारी ईश्वरप्रसाद लाहोटी यांचा २३ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पकडल्याने खळबळ माजली आहे. रविवारी मात्र शहरात सर्वत्र गुटका विक्री चालूच होती. लाहोटी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.
शहरात अनेक दिवसापासून गुटख्याची बिनधास्त विक्री चालू आहे. शासनाने गुटका विक्रीवर बंदी घातलेली असतानाही गुटख्याचा परळी व ग्रामीण भागात व्यापार सुरुच असून, यात दररोज १० लाख रुपयांची उलाढाल असल्याची माहिती आहे. प्रमुख गुटखा विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना गुटख्याचा पुरवठा करतात. त्यापैकीच ईश्वरप्रसाद लाहोटी हा एक आहे. लाहोटी हा घरातून गुटखा पुरवठा करीत होता. संभाजीनगर पोलिसांनी त्यास ही विक्री बंद करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर त्याने परळीतून गुटख्याचा साठा ग्रामीण भागात हलविला होता. टोकवाडी येथून गुटख्याच्या ९२ गोणी ट्रकमधून धमार्पुरीकडे नेताना अंबाजोगाई अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या पथकाने पकडला.
यापूर्वी अनेक गुटखाविक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तर काही गुटखा विक्रते आणखी कारवाईपासून दूरच आहेत. पोलिसांना गुटखा विक्रेत्यांचा मागमूस लागत नाही. त्यामुळे गुटख्याची विक्री जोरात सुरु आहे. शनिवारी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी रविवारी मात्र गुटख्याचा पुरवठा सुरुच होता. अन्न व औषध प्रशासनास गुंगारा देऊन विक्री केली जाते. लाहोटी सारखे आणखी पाच मटका किंग असून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Web Title: A paltry sum of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.