बैलजोडी चोरणाऱ्याला पकडले तर दोघे पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:30 IST2021-03-14T04:30:20+5:302021-03-14T04:30:20+5:30

केज : शेतातील गोठ्यात बांधलेली बैलजोडी चोरुन घेऊन जात असलेल्या बैल चोराला जीवाचीवाडी शिवारात पकडले, मात्र त्याचे दोन साथीदार ...

The pair of oxen were caught and the two escaped | बैलजोडी चोरणाऱ्याला पकडले तर दोघे पळाले

बैलजोडी चोरणाऱ्याला पकडले तर दोघे पळाले

केज

: शेतातील गोठ्यात बांधलेली बैलजोडी चोरुन घेऊन जात असलेल्या बैल चोराला जीवाचीवाडी शिवारात पकडले, मात्र त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात शेतकऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील तुकुची वाडी येथील शेतकरी शेषेराव उत्तम मोराळे यांनी त्यांची बैल जोडी गोठ्यात बांधली होती. गोठ्यात बांधलेली बैलजोडी रोजी रात्री एक वाजता आरोपी विजय फुलचंद राख रा. कोरडेवाडी ता. केज हा त्याच्या ईतर दोन साथीदारासह चोरून घेऊन गेला. मात्र शेतकऱ्यास जाग आल्याने गोठ्यात बांधलेली बैल जोडी दिसून न आल्याने त्याने बैल जोडीचा शोध घेतला ही बैल जोडी जिवाचीवाडी शिवारातून विजय राख व त्याचे दोन साथीदार घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्याने बैलजोडीसह चोराला पकडले. मात्र अंधाराचा फायदा घेत त्याचे दोन साथीदार पळून गेले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात शेषेराव मोराळे यांच्या तक्रारीवरून विजय फुलचंद राख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण मुंडे करत आहेत.

Web Title: The pair of oxen were caught and the two escaped