विविध मागण्यांसाठी तब्बल २१ वेळा बीड जिल्ह्यात संप पुकारून बंद पाळण्यात आला, तर २७९ आंदोलने झाली आहेत. यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, धरणे, निदर्शने आदींचा समावेश आहे. ही आकडेवारी जानेवारी ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीतील आहे. ...
सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतात, हा समज बीड जिल्हा रूग्णालयात साफ चुकीचा ठरत आहे. तपासणी जरी दहा रूपयांत होत असली तरी औषधोपचाराला मात्र हजारो रूपये मोजावे लागत आहेत. सध्या रूग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ...
बीड शहरातील सारडा नगरीत चरखा, कुलकर्णी व देशपांडे तर विद्यानगर भागात अमृता सक्सेना यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. याचा तपास सुरू असतानाच बुधवारी रात्री मोंढा भागात दोन दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. ...
माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत विकसनशील आहे. त्यामुळे या ठिकाणी ऊसाचे मोठे उत्पादन आहे. मात्र येथील कारखान्यांनी शेतकºयांच्या हिताच्या २६५ जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे. ते तात्काळ सुरू करावेत, अन्यथा तीनही कारखान्याचे धुरांडे शिवस ...
उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते ...
तलावात पोहताना बुडणाऱ्यास वाचविताना अन्य दोन मुलांचाही दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांड्यावर घडली. तिन्ही मुलांचे पालक ऊसतोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यात गेले असताना इकडे गावात हि दुर्घटना घडली. ...
बीड शहरातील घाण, मृत प्राणी, कचरा आदींच्या तक्रारी आता आपल्याला मोबाईलद्वारे करता येणार आहेत. पालिकेने नागरिकांसाठी ‘स्वच्छता अॅप’ उपलब्ध करून दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून आलेल्या जवळपास ९० टक्के तक्रारींचे निरसन झाले आहे. हे अॅप जास्तीत जास्त ...
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे मंगळवारी ३० मेंढ्या दगावल्याची घटना घडली. कापसाची फेकून दिलेली बोंडअळीग्रस्त बोंडे खाल्याने विषबाधा होऊन मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. ...
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यां ...