रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात स ...
अक्षय तृतीयेला वाढती मागणी लक्षात घेत बाजारात आंब्याने चांगलाच भाव खाल्ला. मंळवारपासून आंब्याचे भाव १०० ते १५० रुपये किलो होते. त्यामुळे ग्राहकांनाही आखडता हात घ्यावा लागला. आवश्यक तेवढेच आंबे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. ...
बीड जिल्ह्यात नोंदणी केलेले १६ हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतिक्षेत असताना नाफेडच्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी हमीदराने तूर खरेदी बंद झाल्याने एसएमएस मिळालेल्या व केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी तूर आता कोठे विकायची असा प्रश्न निर्माण झाला आह ...
काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, राजस्थान, हरियाणासह महाराष्टÑात महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करत मंगळवारी शहरात ...
लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नाफेडच्या मुंबई कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तेथील संगणकीय प्रणाली साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठवणे बंद झाले आहे. तूर खरेदीसाठी केवळ दोन दिवसांचा का ...
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. आतापर्यंत तीन मेळावे घेतल्यानंतर मंगळवारी आणखी एक मोठा रोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये बेरोजगारांची गर्दी उसळली. ...
बीड शहरात अनधिकृत नळ जोडणी असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर याची पाणीपुरवठा विभागाने गंभीर दखल घेत अनधिकृत नळ जोडणींवर कारवाई करण्यासाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले आहे. ...
बीड जिल्हा क्रीडा कार्यालयात केवळ बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. ते ही विविध कामानिमित्त बाहेर पडल्याने कार्यालय रामभरोसे असते. सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. केवळ एक ...
धारुर तालुक्यातील कोळपिंप्री येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सरपंच विजयकुमार खुळे यांच्या आई सुशीलाबाई खुळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. तसेच गावात अन्य एकाच्या घरी चोरी झाली. तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत् ...