तालुक्यातील डाके पिंपरी येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे गोदाकाठी मोठी आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केल्याने वणव्यासारखी आग पसरत गेली. ...
शहरातील कचरा डेपोमुळे प्रदूषणात वाढ होऊन वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बुधवारी डेपोच्या गेटवर कचरा घेऊन गेलेल्या घंटा गाड्या वडार वस्तीतील लोकांनी अडवून विरोध केला. गाड्याच्या चालकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दिलीप भीमराव चव्हाण (४५ रा.उदंडवडगाव) यांना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने (के.ए.०२ ए.एफ. ९४८४) जोराची धडक दिली. यामध्ये चव्हाण हे जागीच ठार झाले. ...
तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे. ...
गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...