बदली कामगारांचा आक्रोश; सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 18:50 IST2021-01-28T18:47:22+5:302021-01-28T18:50:56+5:30
न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत.

बदली कामगारांचा आक्रोश; सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत काढला मोर्चा
अंबाजोगाई : जाचक अटी शिथिल करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालया मधील बदली कर्मचा-यांना सेवेत कायम करावे. यामागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मागील दहा दिवसापासून बदली कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरु आहे. मात्र सरकारने याची कुठलीच दखल घेतली नाही. यामुळे पुरुष बदली कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत मुंडन करत उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय अंबाजोगाई येथे 09/07/1999 रोजी दिलेल्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सन 2000 मध्ये 19 बदली कर्मचारी यांना कायम करण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जेष्ठता यादी तयार करून रिक्त जागेवर 29 दिवसांच्या तत्वावर आजतागायत आदेश मिळत आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणी होत आहे. परंतु, पुर्वी संचालक यांच्या पञानुसार रिक्त असलेल्या पदावर कायम केले जात नाही.
न्यायालयीन आदेशानुसार तयार केलेल्या जेष्ठता यादीमधील उर्वरित 214 कर्मचारी यांना 29 दिवसांच्या तत्वावर कोरोना, सारी, महाभयंकर व इतर रोगांच्या साथीमध्ये आवश्यकतेनुसार कामावर घेतले व रूग्णांची सेवा केली.1980 पासुन कार्यरत बदली कर्मचारी यांना सेवेत कायम केले नाही. यामुळे अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ही बिघडत चालली आहे. 10 वर्षे व 240 दिवस भरले पहिजेत ही जाचक अट शिथिल करून बदली कर्मचारी यांना सेवेत कायम करावे. या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या 30 वर्षांपासुन बदली कर्मचारी यांची सेवेत कायम करण्याची मागणी अद्याप प्रलंबीत आहे. बदली कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मोर्चात विलास काळुंके, शेख जमीर, दिलीप गालफाडे, सिमरन बक्ष, पुष्पा कचरे, उर्मिला शिंदे, प्रकाश कसबे, अशोक गायकवाड आदींचा सहभाग होता.