धारूर येथील जिनिंगमध्ये आगीचे तांडव; लाखोचे नूकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:30 IST2020-12-31T17:26:46+5:302020-12-31T17:30:14+5:30
fire in the cotton factory : अंबेजोगाई, धारूर आणि माजलगाव येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

धारूर येथील जिनिंगमध्ये आगीचे तांडव; लाखोचे नूकसान
धारूर : येथील आडस रोडवरील बालाजी जिंनीगमध्ये गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर येथील आडस रस्त्यावरील बालाजी जिनिंग-प्रेसिंगवरील कापसाला सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. अंबेजोगाई, धारूर आणि माजलगाव येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या ठिकाणी पाच हजार क्विंटल पेक्षा जास्त कापसाची खरेदी झाल्याची माहिती आहे. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली.