अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:42+5:302021-02-07T04:31:42+5:30
या स्पर्धा खुल्या असून १०० मीटर धावणे आणि गोळाफेक स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला प्रत्येकी २५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ...

अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धा खुल्या असून १०० मीटर धावणे आणि गोळाफेक स्पर्धेत प्रथम येणाऱ्याला प्रत्येकी २५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. पुरुषासाठी तीन कि.मी. धावणे खुला गट आणि गोळाफेक मुले ७.२ किलो. खुला गट असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. १०० मीटर धावणे ज्यामध्ये मुला-मुलींचा सहभाग आहे, तर ४ किलो गोळाफेकमध्ये अशी स्पर्धा आहे. १०० मीटर धावणे मुले व मुली यांचे वयोगट योग्यपद्धतीने काढलेले आहेत. प्रत्येक गटाला प्रथम,द्वितीय व तृतीय याप्रमाणे पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी आपल्या ओळख आणि वयाचा पुरावा म्हणून आपले ओरिजनल आधारकार्डसोबत आणावे. नाव-नोंदणीसाठी राष्ट्रीय खेळाडू दिनेश पवार आणि प्रशिक्षक अंगद केंद्रे यांच्याशी संपर्क साधावा. एकूण ४३ हजार रुपयांची पारितोषिके वेगवेगळ्या गटांसाठी असल्याची माहिती आयोजक प्रवीण देशमुख यांनी दिली.