लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 18:04 IST2021-07-08T18:03:48+5:302021-07-08T18:04:37+5:30

Rape on Minor in Beed District : लग्नाचे आमिष देऊन शहरील एका लॉजवर नेऊन केले अत्याचार

Oppression of a minor girl by the lure of marriage; Accused arrested | लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

परळी ( बीड ) :  लग्नाचे आमिष दाखवून येथील एका 15 वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी सात जुलै रोजी फिर्याद दिल्यावरून रात्री दादाहारी वडगाव येथील एका इसमा  विरोधात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात  बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपीस पोलिसांनी आटक केली आहे. आरोपीचे परळीत विद्युत साहित्याचे दुकान आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका पंधरा वर्षीय मुलीसोबत दादाहारी वडगाव येथील जनक दगडु यादव या व्यक्तीने ओळख वाढवली. यादवने लग्नाचे आमिष देऊन शहरील एका लॉजवर आणून तिच्यावर अत्याचार केला. तसेच शहरातील कंडक्टर कॉलनी येथे एका भाड्याचा घरात वारंवार शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर यादवने लग्नास नकार देऊन जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी करत मुलीला एकटे सोडून दिले. हा प्रकार 20 जून  चे 4 जुलै 2021 दरम्यान घडला आहे. 

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून जनक यादव ( रा.दादाहारी वडगाव ) याच्या विरोधात ७ जुलै रोजी येथील संभाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांनी तपास करत आरोपीस अटक केली आहे. 

Web Title: Oppression of a minor girl by the lure of marriage; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.