शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाला संधिसाधू जवळचे, पंकजा मुंडे माझ्यासारखे दूरचे"; एकनाथ खडसेंची खदखद बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 14:15 IST

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट

परळी (बीड): राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची परळीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खडसे- मुंडे यांच्यात काही मिनिटे बंददारा आड चर्चा झाली. यावेळी पंकजा मुंडे यांची व आपली कौटूंबिक भेट आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. मात्र, पंकजा मुंडे यांची सध्या भाजपमध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना होत असल्याची खंत देखील खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नववा स्मृतिदिनी परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन  तीन जून रोजी  सकाळी  राष्ट्रवादी चे नेते एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे यांनी परळी शहरातील निवासस्थानी जाऊन  पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा झाली. त्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी पंकजा मुंडे यांची व आपली कौटूंबिक भेट आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी दिले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपाने संधीसाधू लोकांना जवळ केले आणि माझ्या सारख्यांना व पंकजा मुंडे यांना दूर केले आहे, अशी खदखद खडसे यांनी व्यक्त केली.

पंकजा मुंडे यांची स्थितीपाहून वेदनाखडसे पुढे म्हणाले, राजकारणात गोपीनाथराव मुंडे आणि मी अनेक वर्ष मिळून काम केले आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपचा राज्यभरात  विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. राज्यात संघर्ष यात्रा काढल्या. बहुजन समाजापर्यंत भाजप पक्ष नेण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी काम केले आहे. परंतु, सध्या भाजपचे स्वरूप बदलले आहे. जुन्या लोकांना मागे करून त्यांचा मानसिक छळ सुरू केला आहे. नव्याने आलेल्या लोकांचे भाजपामध्ये योगदान शून्य आहे. परंतु, पंकजा मुंडे यांची सध्या भाजपमध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना झाल्या असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस