६७ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:59+5:302021-08-28T04:37:59+5:30
बीड : गेवराई येथील बसवेश्वर कॉलनीतील एकास ‘फ्लिपकार्ट हेल्पलाइनमधून’ बोलत असल्याची बतावणी करीत नवीन मोबाइल घरपोच पाठवतो, असे ...

६७ हजार रुपयांना ऑनलाइन गंडा
बीड : गेवराई येथील बसवेश्वर कॉलनीतील एकास ‘फ्लिपकार्ट हेल्पलाइनमधून’ बोलत असल्याची बतावणी करीत नवीन मोबाइल घरपोच पाठवतो, असे सांगून ऑनलाइन ६७ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना १३ जुलै रोजी घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर भाऊसाहेब गंगाधर, असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी नवीन मोबाइल खरेदी करण्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ तपासणी केली होती. यावेळी एक मोबाइलदेखील पसंत केला होता. दरम्यान, त्यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी एका मोबाइल क्रमांकावर संवाद साधला. यावेळी ‘आपण घरपोच मोबाइल पाठवून सांगितल्याप्रमाणे पेमेंट करा’ असे सांगून त्यांच्या खात्यावरून ६७ हजार ८४४ रुपये लंपास केले. ही घटना जुलै महिन्यात घडली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर गंगाधर यांनी बँकेतदेखील विचारणा केली. सायबर विभागात यासंदर्भात तक्रार दिली होती. त्यावरून फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यामुळे २६ ऑगस्ट रोजी गेवराई पोलीस ठाण्यात यासंदर्भात मोबाइल क्रमांकावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...
ऑनलाइन फसवणूक वाढली
विविध कंपनीच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करीत ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.