एक, दोन, तीन, चार, कुपोषण करू हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:39 IST2021-09-14T04:39:48+5:302021-09-14T04:39:48+5:30

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव येथील सरस्वती विद्यालयात शनिवारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण ...

One, two, three, four, banish malnutrition | एक, दोन, तीन, चार, कुपोषण करू हद्दपार

एक, दोन, तीन, चार, कुपोषण करू हद्दपार

माजलगाव : तालुक्यातील राजेगाव येथील सरस्वती विद्यालयात शनिवारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या पोषण अभियान अंतर्गत पोषण उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना ॲनिमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर शालेय परिसरात विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. एक, दोन, तीन, चार कुपोषण करू हद्दपार, अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. यावेळी मुख्याध्यापक मनोज सोळंके, टाकरवण केंद्राच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका के. आर. ढाले, अंगणवाडी कार्यकर्त्या संजीवनी कचरे, जनाबाई गिलबिले, कल्पना बिक्कड, रुक्मिण चव्हाण, किरण काळे, सरूबाई सितकर, सुवर्णा कदम, आशा साळाप्पा, धम्मा घायाळ, मंगल डमाळे, ज्ञानेश्वरी राऊत, वैशाली सातपुते, मंगल मोरे, आदींची उपस्थिती होती.

130921\purusttam karva_img-20210913-wa0099_14.jpg

Web Title: One, two, three, four, banish malnutrition