पांगरबावडी ट्रक अपघातातील दुचाकीवरील ‘त्या’ एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:11+5:302021-03-13T04:58:11+5:30
हनुमंत ननवरे (रा. अंबेसावळी, ता. जि. बीड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रकच्या भीषण अपघातात आतापर्यंत ६ ...

पांगरबावडी ट्रक अपघातातील दुचाकीवरील ‘त्या’ एकाचा मृत्यू
हनुमंत ननवरे (रा. अंबेसावळी, ता. जि. बीड) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रकच्या भीषण अपघातात आतापर्यंत ६ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर याच वेळी झालेल्या तीन अपघातांतील ७ जणांवर अद्याप देखील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. अपघातातील ट्रकचालकाविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि शरद भुतेकर करत आहेत.
चालक अद्याप फरार
ट्रकच्या धडकेत रिक्षामधील ५ व दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यापासून चालक फरार असून, त्याचा अद्याप ठावठिकाणा लागेला नाही. बीड ग्रामीण व पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दोन्ही पोलीस ठाण्यांच्या वतीने चालकाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
===Photopath===
110321\11bed_30_11032021_14.jpg
===Caption===
हनुमंत नन्नवरे