शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जिवंत काडतूसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 7:37 PM

दहशत निर्माण करून गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दहशत निर्माण करून गुन्हा करण्याची तयारी फसली

बीड : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल सोबत बाळगणाऱ्या एकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर केली. दहशत निर्माण करून गुन्हा करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

राहुल प्रकाश तुपे (२२ रा.गोविंदनगर, बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुलने चार वर्षापूर्वी माळीवेस भागात गिफ्ट शॉपी टाकली होती. मात्र यामध्ये तोट्यात गेला. याचदरम्यान त्याची याच भागातील एका कुख्यात आरोपीसोबत मैत्री झाली. सहा महिन्यापूर्वी त्याने दुकान बंद केले. ते व्यसनी झाला होता. त्यामुळे पैशाची चणचण जाणवू लागली. तीन महिन्यापूर्वी त्याने आपल्या मित्राकडून गावठी पिस्तूल २५ हजार रूपयांचा विकत घेतला. याच पिस्तूलचा धाक दाखवून तो खंडणी व इतर गंभीर गुन्हे करण्याची तयारी करीत होता.

दरम्यान, राहुल हा आपल्या मित्रांसमवेत बार्शी रोडवरील एका हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलजवळ बाळगून मद्यपान करीत असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना समजले. त्यांनी तात्काळ सपोनि दिलीप तेजनकर आणि टिमला पाठविले. अचानक धाड टाकून पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर श्रीमंत उबाळे यांच्या फिर्यादीवरून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, गणेश दुधाळ, विष्णू चव्हाण, शेख नसीर, सुग्रीव रूपणर, नरेंद्र बांगर, श्रीमंत उबाळे आदींनी केली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी