उजव्या कालव्यात कार कोसळून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:59+5:302021-06-20T04:22:59+5:30
गेवराई (जि. बीड) : गावाकडे जाताना अंदाज न आल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून एक जण ठार तर ...

उजव्या कालव्यात कार कोसळून एक ठार
गेवराई (जि. बीड) : गावाकडे जाताना अंदाज न आल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्यात कार कोसळून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी शनिवारी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
राजेश रामकिशन जायभाय (२२) असे अपघातातील मयताचे नाव असून, सदाशिव नागरे (२०) असे जखमीचे नाव आहे. दोघे तालुक्यातील संगमजळगाव येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री दोघे गेवराई येथून ते आपल्या कारने संगमजळगावकडे जात होते. सध्या कोल्हेर शिवारातील उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांना अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे कार उजव्या कालव्यात पडली. या अपघातात राजेश जायभाय यांचा जागीच मृत्यू झाला. सदाशिव नागरे हा किरकोळ जखमी झाला असून, प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. मयत राजेशवर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शनिवारी दुपारी संगमजळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी बीट अंमलदार विठ्ठल देशमुख यांनी घटनेचा पंचनामा केला असून, उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
===Photopath===
190621\fb_img_1624089469123_14.jpg